TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

vijay waghmare by vijay waghmare
May 7, 2026
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) – शहरात गंभीर पाणीटंचाई निर्माण झालेली असताना नगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी केला आहे. जनतेच्या जीवावर सत्ता मिळवून “दोन दिवसाआड पाणीपुरवठा” करण्याचे आश्वासन देणाऱ्या माजी आमदारांचे दावे पूर्णपणे फोल ठरल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आमदार पाटील म्हणाले की, गेल्या दीड महिन्यांपासून शहरभर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अनेक वर्षांनंतर प्रथमच अमळनेरकरांना उन्हाळ्यात पाण्यासाठी व्याकूळ व्हावे लागत आहे. नागरिक नियमितपणे पाणीपट्टी भरत असताना देखील त्यांना दहा-दहा दिवस पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 मे 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2026 !

“उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली आहे. उष्माघातामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना इकडे-तिकडे भटकंती करावी लागत आहे. शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून टाक्या पुरेशा भरल्या जात नाहीत. दहा दिवसांआडही कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे,” अशी टीका त्यांनी केली.

जळोद डोहातील पाणी कमी झाल्यानंतर गंगापुरी डोहातून पाणी आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “त्यासाठी खर्च होत असेल तर आवर्तन का घेतले जात नाही? आवर्तनासाठी ४० लाख रुपये खर्च झाले तरी हरकत नाही. तो पैसा जनतेचाच आहे आणि जनतेला पाणी मिळाले पाहिजे. इतर कामे कमी करा, पण पाणीपुरवठा सुरळीत करा.”

पालिकेतील काही नगरसेवक स्वतःच्या भागात अधिक पाणी सोडून घेण्यासाठी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याच्या तक्रारीही आपल्याकडे आल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, शहरातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत न केल्यास शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आमदार पाटील यांनी दिला.

२०० कोटींची पाणीपुरवठा योजना रखडल्याचा आरोप

अमळनेर शहराची पुढील ५० ते ६० वर्षांची पाण्याची गरज लक्षात घेऊन धरणावर आधारित सुमारे २०० कोटी रुपयांची “२४ बाय ७” पाणीपुरवठा योजना मंजूर करून तिचे काम सुरू करण्यात आले होते. शहरात पाइपलाइन टाकण्याचे कामही सुरू झाले होते. मात्र, सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ही योजना थंडबस्त्यात गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

“मतदारसंघाचा पालक म्हणून मी स्वतः या योजनेकडे लक्ष घालणार असून लवकरच या कामाला गती मिळेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यात्रोत्सव नियोजनावरही टीका

बोरी पात्रातील पारंपरिक यात्रोत्सवाच्या नियोजनावरही आमदार पाटील यांनी टीका केली. “प्रथमच यात्रेत ठेकेदारी आणि वसुलीचा प्रयोग करण्यात आला. त्यामुळे बाहेरगावाहून आलेले विक्रेते आणि पाळणेवाले नाराज झाले असून संपूर्ण नियोजन कोलमडले,” असे ते म्हणाले.

तसेच, जनतेने निवडून दिलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना “बाहुले” बनवून ठेवण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली. “लोकप्रतिनिधींना स्वतंत्रपणे काम करू दिले पाहिजे. नगराध्यक्षांनी कुणाचे बाहुले बनणे लोकशाहीला शोभणारे नाही,” असा सल्लाही त्यांनी दिला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: AmlnerMLA Anil Patil attacks the ruling party over water shortage in Amalner

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 मे 2026 !

May 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2026 !

May 6, 2026
जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 मे 2026 !

May 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 मे 2026 !

May 4, 2026
जळगाव

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

May 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुप्रीम कोर्टाने ईडीला फटकारले ; अनिल देशमुखांची संपत्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा ‘हा’ आदेश

April 10, 2022

राधिका राजपूतला सीईटी परीक्षेत 99.56 टक्के गुण !

June 18, 2024

अमळनेर तालुक्यात अंगावर वीज पडून मजूर ठार ; पत्नी, सासू आणि दोन मुले जखमी !

October 7, 2022

एकनाथराव खडसेंच्या पत्नी मंदाकिनी ईडी कार्यालयात दाखल !

October 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group