बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्पायासाठी बोदवड शहरात शनिवार व रविवारी असे दोन दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तहसीलदार हेमंत पाटील, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले,पोलीस निरीक्षक बळीराम हिरे,नगराध्यक्षा मुमताजबी बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार रोजी गांधी चौकात एक बैठक घेण्यात आली. यात बोदवड शहरात शनिवार रविवारी हे दोन दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी विरोधीपक्ष गटनेता नगरसेवक देवेंद्र खेवलकर. व्यापारी संघटना अध्यक्ष गोपाल अग्रवाल,उपाध्यक्ष राजेश नानवाणी, व्यापारी, उपस्थित होते. जनता कर्फ्युतून दवाखाने,औषध दुकाने, दूध डेअरी सारख्या अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत.