मुंबई (वृत्तसंस्था) काही आयपीएस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, असा खळबळजनक गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
लोकमत आॅनलाइनच्या ‘ग्राउंड झीरो’ कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी यावर भाष्य केले. देशमुख म्हणाले की, काही अधिकारी चांगले काम करीत आहेत. पोलीस खात्यात काही अधिकारी असेही असतात की त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याच्याबाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही. चार ते पाच वरिष्ठ अधिकाºयांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. त्यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाºयाचाही समावेश होता.
आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, असे सांगणे, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने करणे, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वत: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात चर्चा झाली आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने मिटविण्यात आले. एवढेच नव्हे तर पवार यांनी एका महिला अधिकाºयाचे नाव घेऊन त्यांना तातडीने पदावरून बाजूला करा, त्यांच्याकडे दुसरे काम द्या, असे सांगत अन्य चार अधिकाºयांची नावेही सांगितली होती.