TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिंप्री येथे बचत गटांसाठी “बहिणाबाई मार्ट” उभारणार ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

प्रभाग संघाची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

vijay waghmare by vijay waghmare
May 3, 2025
in जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पिंप्री /धरणगाव धरणगाव/जळगाव (प्रतिनिधी) – घराच्या अर्थव्यवस्थेची खरी धुरीण म्हणजे महिला असून बचत गट हे घरासाठी दुसरी अर्थव्यवस्था आहे. महिलांनी स्थानिक व डिजिटल बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रशिक्षणे घेवून उत्पादने दर्जेदार ठेवावीत, मिळालेल्या कर्जातून रोजगार निर्मिती, व्यवसाय वाढ व उत्पादनात नावीन्यता आणण्यासाठी वापर करावा. असे आवाहन करुन महिला गटांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात ११ ठिकाणी ‘बहिणाबाई मार्केट मार्ट’प्रकल्पासाठी 20 कोटींचा निधी मंजूर केला असून पिंप्री येथेही लवकरच बहिणाबाई मार्ट उभारणार असल्याची ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. ते पिंप्री येथे त्रिवेणी संगम महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

त्रिवेणी संगम महिला प्रभाग संघात 31 ग्रामपंचायती आणि महिला बचत गटांच्या 32 ग्राम संघाचा समावेश आहे. यावेळी वर्षभरात केलेल्या कर्ज वाटपाचा आणि विनियोगाचा लेखाजोखा मांडला गेला.

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

याप्रसंगी जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी सांगितले की, पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात मागील दोन वर्षात 724 कोटींचे कर्ज वाटप केले असून जिल्हयात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहे. तसेच महीला बचत गटांनी नाविन्यपूर्ण वैयक्तिक व्यवसायला प्राधान्य द्यावे. समाधान पाटील व उद्योग निरीक्षक एस. टी. लासुरकर यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विवीध योजनांची माहिती विशद केली. उषाबाई गुरव आणि प्रतिभा पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बचत गटाच्या महिलांकडून साहित्य खरेदी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक किरण महाजन यांनी केले. सूत्रसंचालन आर्थिक साक्षरता सखी ज्योती बडगुजर यांनी तर आभार समुदाय संसाधन व्यक्ती सारिका पाटील यांनी मानले.

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, गटविकास अधिकारी किशोर वानखेडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई, जिल्हा संसाधन व्यक्ती समाधान पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक किरण महाजन, या प्रभाग संघाच्या अध्यक्षा सुवर्णा देसले, सचिव मालती बडगुजर, खजिनदार प्रतिभा पाटील यांच्यासह या जिल्हा परिषद गटातील 32 ग्राम संघाचे पदाधिकारी, केडर, समुदाय संसाधन च्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Dhrangaongulabrao patil

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
गुन्हे

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

May 6, 2026
गुन्हे

पुण्यात मुलाकडे गेलेल्या स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 6, 2026
जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 5, 2026
गुन्हे

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

May 5, 2026
Next Post

महिलांना मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात ; चोरट्यांनी सोनपोत लांबवल्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड पोलिस ठाण्यातील लाचखोर हवालदारासह पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

February 25, 2023

पोलिसांवर दगडफेक प्रकरण ; 16 संशयितांविरोधात गुन्हा !

August 6, 2023

Gold Price Today : गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण !

March 22, 2023

देवेंद्र फडणवीस यांना अटक करा : रुपाली चाकणकर

April 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group