TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपा सरकार विरुद्ध काँग्रेस जिल्हाभर छेडणार आंदोलन : अॅड.संदीपभैय्या पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
September 29, 2020
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन विधेयके संसदेत मंजूर करून नवीन आणलेल्या काळया कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. या विधेयकांच्या विरोधात लाखो शेतकरी व शेतमजूर रस्त्यावर येऊन याला तीव्र विरोध करत असताना हे निर्दयी व हुकूमशाही सरकार त्यांचा आवाज बंद करण्यासाठी लाठीचार्ज करीत आहेत. या अन्यायाविरुद्ध व अन्यायग्रस्त कायद्यांच्या विरोधात जिल्हा कॉंग्रेसतर्फे जिल्हाभर तालुकास्तरीय आंदोलने छेडले जाणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप सुरेश पाटील यांनी कळविले आहे.

 

READ ALSO

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

या प्रसिध्दी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, या सरकारचा पूर्वानुभव पाहता ते संस्थेसह कोणाशीही चर्चा वा संवाद न साधताच गरिबांवर व शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असा हा कायदा लादत आहेत. यापूर्वी ही दिनांक २६ सप्टेंबर पासून भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी विधेयकांना विरोध दर्शविण्यासाठी ऑनलाईन मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. सोशल मीडिया मार्फत भाजप सरकारचा निषेध करण्याचे व सदर काळा कायदा मागे घेण्याची मागणी करण्याची मोहीम सुरू झालेली असून, यापुढे २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान वेळोवेळी विविध आंदोलने छेडली जाणार आहेत. त्यात सर्वप्रथम दिनांक २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने ‘मजदूर बचाव दिवस’ पाळला जाणार आहे या दिवशी तालुकास्तरावर कॉंग्रेसच्या मुख्यालयात आणि जिल्हा मुख्यालया मध्ये धरणे आंदोलने तसेच मोर्चा काढून शेतकरी विधेयक तात्काळ मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे.

 

यावेळी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, फ्रंटल चे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांना सोबत घेऊन हे आंदोलन छेडले जाणार आहे. तसेच १० ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय किसान संमेलन संपन्न होणार आहे. या किसान संमेलनातून ही भाजपाने केलेल्या या अन्यायग्रस्त कायद्यांच्या विरोधात आवाज उठवला जाणार आहे. तसेच २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे. शेतकरी, शेतमजूर, बाजार समितीतील दुकानदार, बाजार समितीमधील कामगार, कष्टकरी यांच्या सह्यांची मोहीम राबवून दोन कोटी सह्यांचे निवेदन तयार करून भाजपा सरकारचा निषेध व्यक्त केला जाणार असून शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांच्या विरोधात जो काळा कायदा निर्माण केला आहे तो मागे घ्यावा यासाठी सर्वसामान्य माणसांना शेतकऱ्यांना सोबत घेऊन आवाज उठविला जाणार आहे. अशी माहिती प्रसिध्दी पर पत्रातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
जळगाव

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
Next Post

माहिती अधिकार दिनाचा फलक त्वरीत लावावा ; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिंपरखेड येथे पुरात दहा हजार कोंबड्या गेल्‍या वाहून !

September 1, 2021

वाढदिवसानिमित्त माजी आमदार शिरीष चौधरींनी केले रक्तदान

April 6, 2021

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 27 जून 2025 !

June 27, 2025

दुध संघाचे विक्री विभागाचे प्रमुख अनंत ए. अंबीकर निलंबित !

October 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group