धरणगाव ता.साळवा (प्रतिनिधी) येथील ग्रामपंचायतमध्ये आज महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पोलीस पाटील निसार पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना यांच्या प्रतिमेस कोरोना समिती सचिव, तंटामुक्त समिती सचिव तथा पोलीस पाटील निसार पटेल यांनी माल्यार्पण केले. यावेळी ग्रामपंचायत लिपीक किशोर बोरोले व कर्मचारी उपस्थित होते.