जळगाव (प्रतिनिधी) लाॕकडाऊन काळात चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता स्फूर्ती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेद्वारा ५ ते १० वयोगटातील चिमुकल्यांकरिता धीना…धीन…धा.. टाॕपडान्सर राज्यस्तरिय नृत्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शेवगावची आरोही प्रथम तर पुण्याच्या आर्याने द्वितीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेला महाराष्ट्रातील अमरावती,अकोला,नागपूर ,जळगाव,मुंबई ,नाशिक ,औरंगाबाद,कोल्हापूर, भिवंडी, भंडारा, यवतमाळ, रायगड,रत्नागिरी, अहमदाबाद,पुणे,फलटण अगदी सर्व जिल्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चिमुकल्यांनी आपल्या कलाविष्काराने मोठ्या संख्येने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेला केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातून प्रेक्षकांच्या अतिशय सुंदर अशा प्रतिक्रिया आल्यात. स्पर्धकांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. यात शेवगाव अहमदनगर जिल्ह्यातील ६ वर्षांची चिमुकली आरोही विजय पायघन हिने प्रथम, तर,मुळची धुळ्याची परंतु पुण्याला राहणार कु. आर्या जयदीप पाटील हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर तृतीय क्रमांक कु.सई राम पायघन तर ठाण्याचा मेघ स्वप्निल सोनार फक्त तीन वर्षाचा चिमुकला याने प्रोत्साहनपर क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता सोनी पाटील, तेजस्विनी झेंडे, शेखर सावंत, उज्वल सिंघवी, अर्चना येवले, सिध्दार्थ जगताप यांचे सहकार्य लाभले. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मान पञ व वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारी उपयोगी वृक्षाची कलम भेट देण्यात आली. सर्व स्पर्धकांनी आयोजक स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष पल्लवी भोगे (पाटील) यांचे मनपूर्वक आभार मानलेत.