TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कारागृहाचे गज कापून गंभीर गुन्ह्यातील चार कैद्यांचे सिनेस्टाईल पलायन !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर (वृत्तसंस्था) संगमनेर येथील शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातून चार कैद्यांनी सिनेस्टाईल पलायन केल्याची घटना बुधवारी पहाटे पाच वाजता उघडकीस आली.  बलात्कार, खून सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कारागृहात असणाऱ्या चार आरोपींनी एकाच वेळी पळ काढल्यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. राहुल देविदास काळे, रमेश थापा, अनिल छबू ढोले आणि मच्छिंद्र मनाजी जाधव अशी या चार फरार गुन्हेगारांची नावे आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील जेलमध्ये या चार कैद्यांना इतरांसोबत ठेवण्यात आले होते. त्या कारागृहामध्ये मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या शेजारीच हे उपकारागृह आहे. बुधवारी पहाटे या कारागृहातील नंबरच्या कोठडीचे गज कापून चार आरोपींनी पलायन केले. अनेक दिवसांपासून हे आरोपी संगमनेरच्या उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत बंदिस्त होते.

READ ALSO

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

पळून गेलेल्या आरोपींपैकी राहुल काळे याच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. मच्छिंद्र जाधव याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा, तर रमेश थापा याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. या आरोपींनी अतिशय नियोजनबद्ध कारागृहातून पलायन केल्याचे समोर आले आहे. कोठडीचे गज कापून बाहेर आल्यानंतर कारागृहाच्या बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दमदाटी करून ते एका खासगी वाहनामध्ये बसून पळून गेले.

कारागृहातून आरोपी पळून गेल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे आदी अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पाहणी केली. आरोपी पळून गेले त्यावेळी तीन पोलीस कर्मचारी कारागृहाच्या बंदोबस्तात होते. तरीही हत्यार कसे उपलब्ध झाले?,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आरोपींच्या शोध घेण्यासाठी पोलिसांची ५ पथके रवाना झाली आहेत. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी दोन आरोपींनी संगमनेर कारागृहातून पलायन केल्याची घटना घडली होती.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
Next Post

प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर झाला वेडापिसा...मग लढवली भन्नाट शक्कल, पण बच्चा चोर समजून लोकांनी दिले फटके !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हातभट्टी दारु, सट्टा, जुगाराविरुद्धच्या कारवाई मोहीमेत १९१जणांविरुद्ध गुन्हे दाखल

May 13, 2026

“आयपीएल” फिव्हरमध्ये आमदारांनी घेतला क्रिकेटचा आनंद

September 28, 2020

निवडणूक निकालांनी स्पष्ट, पक्षाला सुधारणांची गरज : सोनिया गांधी

May 10, 2021

जिल्ह्यात आज आढळले ३८ कोरोनाबाधित, ३१ झाले बरे !

February 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group