भुुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील खडका येथील महापारेशनमध्ये अप्रेंटीस करणार्या उमेदवारांची परीक्षा १८ व १९ रोजी घेण्यात येणार आहे. मात्र या उमेदवारांना महापारेशनकडून अद्याप प्रवेश पत्र उपलब्ध झालेले नाही. दरम्यान, प्रवेशपत्र न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा महापारेशनला देण्यात आलेल्या निवेदनातून केला आहे.
याबाबत, अप्रेंटीसधारकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात, तालुक्यातील खडका येथील महापारेशन विभागात ६३ विद्यार्थ्यांना जानेवारी २०१९ मध्ये जॉईनिंग दिली होती. या उमेदवारांचे प्रशिक्षण जानेवारी २० मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर बीटीआरआय तर्फे दि. १८ व १९ रोजी या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र दि. १४ सप्टेंबर पर्यंत फक्त तीनच उमेदवारांना परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहे. अन्य ६० जण अजूनही प्रवेश पत्राच्या प्रतिक्षेत आहे. यामुळे शैक्षणिक नुकसान होण्याची भिती या उमेदवारांमध्ये निर्माण झाली आहे.
त्यामुळे धास्तावलेल्या संबधित उमेदवारांनी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांना आपली आपबीती कथन केल्यानंतर त्यांनी थेट खडका येथील महापारेशनच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी प्रशासना विभागातील के. डी पाटील यांच्या सह अधिकार्यांसोबत चर्चा केली व विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घेण्याबाबत सुचना दिल्या. विद्यार्थ्यांचे भविष्य खराब झाल्यास रिपाइंच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. यासाठी सर्वस्वी महापारेशन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला.
अप्रेंटीस धारकांच्या परीक्षा बीटीआरआय व सीटीआरआयतर्फे घेण्यात येतात. यात महापारेशनचा काहीही संबंध नाही. विद्यार्थ्यांचे मार्क संबंधित वेबसाईटवर टाकण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात इरत ठिकाणीही अशा अडचणी असल्याचे शासकीय आयटीआयचे कॉर्डीनेटर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच राज्यभरातील ही समस्या आहे. वरिष्ठ स्तरावरुन परीक्षा पुढे ढकलण्याबाबत पाठ पुरावा करण्यात येत आहे. मात्र कमी वेळात काय -काय शक्य होणार.
– विलास खाचणे
सुपरिटेंडन्ट ऑफ इंजिनिअर, महापारेशन खडका