धरणगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धरणगाव आयोजित छात्र गर्जना विद्यार्थी संमेलन कार्यक्रमात शहर कार्यकारणी नुकतीच घोषणा करण्यात आली.
या कार्यक्रमात अभाविप देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य इच्छेश काबरा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंचावर शहराध्यक्ष शाम भाटिया सर, शहरमंत्री आर्यन सैंदाने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना शहराध्यक्ष शाम भाटिया सर यांनी केली. शहरमंत्री आर्यन सैंदाने यांनी मंत्री प्रतिवेदनात मागील वर्षभरात केलेले कार्यक्रम/उपक्रम तसेच आंदोलन यांची मांडणी केली. विद्यार्थ्याच्या न्याय व हक्कासाठी काम केल्याचे त्यांनी सांगितले. अभाविप प्रांत कार्यकारिणी सदस्य यांनी अभाविप मांडणी करत कार्यकत्यांना परिषदेचे काम समजावून सांगितले. परिषदेमध्ये पद नसून प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी देत असतो, म्हणून आपण सर्वांना मिळालेली जबाबदारीला योग्य न्याय द्यावा व राष्ट्र कार्यात सामील व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
नवनिर्वचित कार्यकारीणी पुढील प्रमाणे :
शहर मंत्री : वेदांत भट
सह शहर मंत्री : प्रथमेश कासार
सह शहर मंत्री : अनंता धारणे
सह शहर मंत्री : शारदा पाटील
तालुका संयोजक : सागर महाजन
तालुका सह संयोजक : ओम भोगरे
महाविद्यालय प्रमुख : भूषण तडेराव
महाविद्यालय सह प्रमुख : कृष्णा बडगुजर
TSVK संयोजक : कुणाल कासार
विद्यार्थिनी प्रमुख : राजश्री शिंदे
सोशल मीडिया प्रमुख : यश चौधरी
ज्ञान मंथन प्रमुख : निखिल बयस
SFD सयोंजक : चंद्र सिकरवार
SFS सयोंजक : ओम महाजन
कोष प्रमुख : सुदर्शन मराठे
अभ्यास मंडळ समिती : आरती माळी, गौतम महाजन, मोरेश्वर महाले, विराग चौधरी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा पाटील यांनी केले, तर आभार नवनिर्वाचित शहरमंत्री वेदांत भट यांनी मानले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.