मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेत्री कंगना रनौतच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे कंगनाच्या अडचणींत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
कंगना ड्रग्ज घेत असल्याचा दावा दिग्गज अभिनेता शेखर सुमनचा मुलगा – अभिनेता अध्ययन सुमन याने चार वर्षांपूर्वी दिलेली एक मुलाखतीत त्याने कंगनाने आपल्याला कोकेन घेण्याचा आग्रह केल्याचा दावा अध्ययनने केला आहे. आपण हॅश ट्राय केले होते, पण ते आवडले नव्हते, त्यामुळेच आपण कोकेन घेण्यास नकार दिला होता. कोकेन घेण्यास नकार दिल्यामुळे कंगनाचे आणि माझे कडाक्याचे भांडणही झाले होते, असेही अध्ययनने म्हटले होते. ही मुलाखत पुन्हा व्हायरल झाल्यानंतर त्याबाबतची चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलीसांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.