रावेर (प्रतिनिधी) एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रावेर पोलिसांनी याप्रकरणी जीवन सुधाकर पाटील (वय २१, रा. घोडसगाव ता. मुक्ताईनगर) याला अटक केली आहे.
या संदर्भात महिला पोलीस कर्मचारीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ११ ते १४ जुलै रोजीच्या दरम्यान, संशयित आरोपी जीवन पाटील याने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला मोटार सायकलने तिच्या राहत्या घरुन फुस लावुन पळवून नेले. त्यानंतर उचंदा गावी शेतातील झोपडीत ३ दिवस शारीरीक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी संशयित आरोपी जीवन पाटील विरुद्ध भांदवि ३६३,३७६ (३) सहकलम ४ बाल. लै. अपराधांपासुन संरक्षण कायदा २०१२, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास मपोउपनिरी दिपाली पाटील ह्या करीत आहेत.