जळगाव (प्रतिनिधी) भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सन २०१६ मध्ये राजीनामा देणाऱ्या माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचा सस्पेन्स दिवसागणिक वाढत चालला आहे.
भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळ बाजूला फेकले गेलेले एकनाथ खडसे पक्षांतराच्या निर्णया पर्यंत आले आहेत. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ते भाजपला धक्का देतील, असही बोलल जात होत. मात्र तस काहीही झाल नाही. आता ते दसऱ्याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करतील, अस बोलल जात असले तरी भाजप अजूनही आशावादी आहे. एकनाथ खडसे यांच्या बाबतीत सर्व काही एक-दोन आठवड्यात सुरळीत होईल,’ असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले होते.
भाजपकडून सध्या एकनाथ खडसेंच्या मनधरणीचे जोरदार प्रयत्न सुरु असून लवकरच एकनाथ खडसेंच्या गळ्यात गोव्याच्या राज्यपाल पदाची माळ पडणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.