जळगाव (प्रतिनिधी) कंपनीच्या ऑफीसमध्ये बळजबरीने घुसत लॅपटॉप, प्रिन्टर, सोन्याचे शिक्के, कोरे चेक, इतर साहित्य आणि रोकड असा एकूण 1 लाख 14 हजाराचा ऐवज जबरीने नेल्याप्रकरणीरवी देशमुख, विनोद देशमुख यांच्यासह ११ जणांविरुद्ध रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज वाणी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
मनोज लिलाधर वाणी (वय 40 वर्षे व्यवसाय व्यापार रा. 22 जिल्हा परिषद कॉलनी, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे शहरात 18/2 रामदास कॉलनी येथे मनोकल्प ट्रेडींग अॅण्ड सव्र्व्हीसेस, मनोकल्प प्रतिष्ठान आहे. हे ऑफिस तळ मजल्यावरील 4 रुम सन 2016 पासून घनश्याम लक्ष्मण पाटील (जी एल पाटील ) यांचे कडून भाड्याने करारनामा करुन घेतली आहे. घनश्याम पाटील हे मयत झाल्यानंतर सदरची मिळकत ही वारसा हक्काने त्यांचा मुलगा राजेश घनश्याम पाटील यांच्या नावे झाली आहे. ती जागा भाडेकरू म्हणून त्यांच्या ताब्यात आहे. सन 2018 मध्ये मनोज वाणी आणि त्यांच्या पत्नी कल्पना वाणी यांनी गोदावरी लक्ष्मी को ऑप बँक लि. जळगाव या बँकेकडून कर्ज घेतले होते. त्या करीता श्री राजेश पाटील यांनी आमच्यातील व्यावसायीक संबंधा पोटीवरील नमुद मिळकत ही बँकेला स्वखुशीने रजिष्टर गहाणखत करुन दिली होती. तसेच वाणी यांनी त्यांच्या मालकीची मेहरुण शिवारातील बखळ प्लॉट गट नं 162/1 प्लॉट नं 8 हे गहाण ठेवले होते. त्या पोटी त्यांना एकूण दोन कोटी कर्ज मंजूर झाले होते.
जून 2021 पासून वाणी दाम्पत्याच्या मालकीची मनोकल्प ट्रेडींग अॅण्ड सर्व्हिस प्रा. लि. ही कंपनी व मनोकल्प प्रतिष्ठान हे सदर मिळकतमध्ये चालू आहे. नमुद केलेल्या कंपनीच्या जागेत कंपनीचे मुळ रेकॉर्ड, दस्तऐवज, संगणक, एच पी कंपनीचा लॅपटॉप, तसेच पूर्जचे सोन्याचे व चांदीचे शिक्के व व्यवहारासाठी लागणारी रोख रक्कम, डायनिंग टेबल, खूर्चा, दोन कपाट त्या ठिकाणी ठेवलेले होते. सदर फर्मचे ऑफीस मध्ये प्रदीप बारी शिपाई म्हणून काम करतात.
कोरोना काळात माझ्याकडून कर्जाची नियमीत परतफेड न झाल्याने वाणी यांचे कर्जखाते एन.पी.ए.मध्ये गेले होते. त्यामुळे गोदावरी लक्ष्मी बैंक, जळगाव यांनी सप्टेंबर 2022 मध्ये नमुद गहाण मिळकत ही ताब्यात घेतली आहे. त्यानंतर बँकेशी तडजोड अंती सदरची मिळकत मधील गाळे वाणी यांच्यासह इतर सहा जणांना बँकेने भाडेतत्वावर दिले आहेत. दिनांक 31 ऑक्टोबर सुमारे 12 ते 4 वाजेच्या दरम्यान कंपनीच्या ऑफीसमध्ये शिपाई प्रदीप बारी हे असताना त्यावेळी जितेंद्र उर्फ रवी बाबुराव देशमुख, विनोद पंजाबराव देशमुख, जगदीश पुंडलिक पाटील, मिलींद नारायण सोनवणे, रितेश देवराम पाटील, कैलास पाटील,एक महिला व इतर 1 अनोळखी महिला व तीन ते चार अनोळखी इसम असे हुंडाई कंपनीची क्रेटा गाडी आणि निळ्यारंगाची महिंद्रा स्कॉर्पीओने कंपनीच्या ऑफीसमध्ये आले. त्यांनी शिपाई प्रदीप बारी यांना धमकावून बळजबरीने कंपनीच्या ऑफीसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी शिपाई प्रदीप बारी याने वाणी यांना मोबाईलवर फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. यानंतर मनोज वाणी हे लागलीच कंपनीच्या ऑफीसला पोहचलो. त्यावेळी वरील इसम हे कंपनीचे मुळ रेकॉर्ड, मौल्यवान दस्तऐवज, संगणक, एचपी कंपनीचा लॅपटॉप, तसेच पूजेच्या सोन्याचे 3 ग्रॅमचे 3 शिक्के व 120 ग्रॅम एकुण वजनाचे चांदीचे 6 शिक्के व रोख रक्कम रु 12,500 असा सामान बळजबरीने घेऊन जात असतांना त्यांना दिसले. त्यावेळी त्यांना वाणी यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता जितेंद्र उर्फ रवी देशमुख व विनोद देशमुख अशांनी वाणी यांना पकडून शिवीगाळ करीत तु इथे। थांबला तर तुला मारून टाकू, अशी धमकी दिली. तसेच वरील सामान बळजबरीने मालवाहू रिक्षामध्ये घेऊन गेले.
या सामानात 1) 600-00 रु कि चे कंपनीचे मुळ स्टॅम्पपेपर. त्यात 100 रुद्वराचे 6 स्टॅम्प पेपर 2) 00-00 रु कि चे एक्सीस, गोदावरी लक्ष्मी, एचडी एफ सी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र चे सह्या असलेले कोरे चेक. 3) 22,000/- रू किंमतीचा एच पी कंपनीचा सिल्वर रंगाचा लॅपटॉप जू. वा. 4) 8,000/- रु किं. चा प्रिन्टर इप्सन कंपनीचा काळ्यारंगाचा जू. वा. 5) 13,000/- रु कि चा संगणक संच लिनोव्हा कंपनीचा जू. वा 6) 5000/- रु कि ची एक्साईट कंपनीची 220 एच पी ची बॅटरी 7) 22,000/- रु कि चे 9 ग्रॅम एकूण वजनाचे 3 सोन्याचे पूजेचे शिक्के त्यावर लक्ष्मी, गणपती व सरस्वती असलेले जू. वा 8) 5,500/- रु कि चे 120 ग्रॅम एकुण वजनाचे 6 चांदीचे पूजेच शिक्के त्यावर लक्ष्मी गणपती व सरस्वती असलेले जू. वा. 9) 12,400/- रु कि चा आयताकृती डायनिंग टेबल त्याचे पाय स्टीलचे व दर काच सोबत 5 खुर्चा असलेला जू.वा. 10) 7000/- रु किं चे दोन लाकडी कपाट जू. वा. 11) 6000/- रु किं च्या 5 स्टीलच्या व कुशेनच्या 10 खुर्चा. 12) 12,500/- रु रोख रक्कम त्यात 500 व 100 रु दुराच्या भारतीय चलनी नोटा असा एकूण 1 लाख 14 हजार रुपये घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी रामानंद पोलिसात ३९५, ५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.