जळगाव (प्रतिनिधी) येथील अल फैज फाउंडेशनतर्फे उर्दू माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी जळगाव तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या सामान्यज्ञानवर आधारित स्पर्धा परीक्षेत अनम फिरोज खान, अरशीन इरफान देशमुख व सोबीया शेख परवेझ या के.के ऊर्दू हायस्कूल व ज्यू.कॉलेजच्या विद्यार्थिंनी यश संपादन केले आहे.
येथील अल फैज फाउंडेशनतर्फे उर्दू माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी जळगाव तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या सामान्यज्ञानवर आधारित स्पर्धा परीक्षेत इयत्ता ९ वीच्या गटात अनम फिरोज खानने ४०० गुणांपैकी ३२८, अरशीन इरफान देशमुखने ३२८ व सोबीया शेख परवेझने ३२२ गुण प्राप्त करुन शालेय स्तरावरावर प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करण्याबरोबर जनरल मेरीट लिस्ट मध्येही अनुक्रमे ७ व ९ वा क्रमांक प्राप्त करुन टॉप टेनमध्ये स्थान मिळविले आहे. यशस्वी विध्यर्थीनींना मुख्याध्यापिका शमीम मलीक, अकिल खान, मुश्ताक भिसती व वर्ग शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थाअध्यक्ष व समस्त पदाधिकारी मंडळाने अभिनंदन करून भविष्यातही अशीच प्रगती करण्याची अपेक्षा व्यक्त केली.