(जामनेर प्रतिनिधी) एकीकडे महाराष्ट्र ग्लोबल हॉस्पिटल्सच्या लोकार्पण सोहळ्याची धावपळ सुरू असताना दुसरीकडे मात्र, गिरीश महाजन को बोल दे एक करोड दे नही तो, हॉस्पिटल बॉम्बे उडा देंगे, या आशयाचा धमकीचा फोन आल्यानंतर कार्यक्रम स्थळी प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, महाराष्ट्र ग्लोबल हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येणार होते. दुपारी साधारण एक वाजेच्या सुमारास लोकार्पण सोहळ्याची धावपळ सुरू असताना गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांच्या मोबाईलवर एक फोन आला. समोरील व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. त्यांनी हिंदीमध्ये गिरीश महाजन को बोल दो एक करोड भेज दे, नही तो हम हॉस्पिटल बॉम्ब से उडा देंगे. त्यानंतर थोड्या वेळात पुन्हा एक मेसेज केला. या मेसेज मध्येही हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलीी होती. या प्रकरणी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या धमकीमुळे काही वेळा पोलिस यंत्रणेवर जबरदस्त ताण वाढला होता.