जळगाव (प्रतिनिधी) शहरातील धनाजीकाळे नगरात २४ सप्टेंबर रोजी काही सराईत गुन्हेगारांनी घरफोडी करत ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना मध्यरात्री अटक केली आहे. अजित रशिद पठाण (३२), शंकर विश्वनाथ साबणे (१८), हकिम मोहम्मद नूर शहा (२० सर्व रा. गेंदालाल मिल) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
धनाजी काळे नगरातील रहिवाशी राजेश डिगंबर सोनवणे यांचे घर काही दिवसांपासून बंद होते. चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधत २४ सप्टेंबर धाडसी चोरी केली होती. चोरट्यांनी तीन लोखंडी दरवाजे, बाथरुमचे स्लाईडींगचे दरवाजे, बोअरींगचे पाईप व मोटार, इलेक्ट्रॉक्निक्सचे बोर्ड, वायर तसेच इलेक्ट्रॉनिक्सचा वजन काटा, भांडे ठेवण्याचे रॅक व लोखंडी आदी साहित्य चोरून नेली होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, चोरीचे साहित्य चोरटे आज मध्यरात्री विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वासुदेव सोनवणे, विजय निकुंभ, गणेश पाटील, रतन गिते, भास्कर ठाकरे, अक्रम शेख, योगेश इंधाटे, तेजस मराठे यांच्या पथकाने घरफोडीतील सराईत गुन्हेगारांच्या चोरीचा माल लपवून ठेवलेल्या गेंदालाल मिल कॉम्पलेक्समध्ये धाड टाकत तिघंही आरोपींना अटक केली.