जळगाव (प्रतिनिधी) गणेश कॉलनी रस्त्यावरील खाजा मिया दर्गाच्या शेजारी असलेल्या एक कबरीला अतिक्रमण अथवा अनधिकृत हा शब्द लागू होत नाही व ते काढण्यासाठी सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले. असे म्हणणे सुद्धा योग्य नव्हे कृपया माध्यमांनी व राजकीय नेत्यांनी सदर प्रकरणी भान ठेवून शब्द वापरावे व दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे भावनात्मक आवाहन मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
खाजा मिया दर्गा ची कागदोपत्री वस्तुस्थिती
१) कलेक्टर ऑफ ईस्ट खान्देश यांचे १२ मार्च १९२७ चे सर्वे नंबर २३७ मधील १९ गुंठे जागा ही पीरस्थानची असून त्यावरील सर्व कर माफ केल्याची आदेशाची प्रत
२) गाव नमुना ६ मध्ये हे दिनांक १९ डिसेंबर १९५८ रोजी नोंद क्रमांक ४३३५ अन्वये सर्वे नंबर २३७/ब १९ आर ही जागा सनद प्रमाणे पीरस्थान म्हणून नोंद झाल्याचे आदेशाची प्रत आहे
३) सर्वे नंबर २३७ मधील खाजामिया दर्गा, मस्जिद, अरबी मदरसा, कबर या १९ आर जागेबाबतच्या नकाशाची प्रतमध्ये स्पष्ट नमूद आहे. की ए- पीरस्थान कबर, सी- मध्ये रस्त्याच्या आत एक कबर दाखवलेली असून (सद्याचे वादातीत कबर) त्या जागेच्या बाहेरून मुख्य रस्ता दर्शविलेला आहे. सदर चा नकाशा दिनांक १९ मे १९२५ चा असून त्या नकाशाची प्रत कोर्ट कामकाजासाठी वकिलांना दिनांक २८ नोव्हेंबर १९९५ ला दिल्याचे दिसून येते.
४) सीईओ महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वक्फ औरंगाबाद यांनी खाजामिया दर्गा, मस्जिद, मदरसा ,जळगावच्या मिळकतीबाबत नोंद करण्यासंबंधी तहसीलदार, आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका, सब रजिस्टर जळगाव व सिटीसर्वे ऑफिसर यांना दिनांक १२ जानेवारी २००७ रोजी पत्र देऊन सदर १९ आर जागेबाबत आदेश दिलेले आहेत.
५) सन १९६० ते १९६९ पर्यंत सर्वे नंबर २३७ / ब वर पीरस्थानची नोंद असले बाबत दाखविणारे ७/१२ उतारा ची प्रत वरून स्पष्ट होते की ती जागा पीरस्थान ची आहे.
६) रे. मू .न. ४३७/ ७४ मध्ये जळगाव कोर्टात सर्वे नंबर २३७ / ब चे पीरस्थानकडे असलेले जमिनीचीची मोजणी शीट दाखल केलेली आहे. त्यावर सुद्धा स्पष्टपणे आहे.
७) खाजामिया ट्रस्टने जळगाव शहर महानगरपालिकेला त्यांच्या १८ मे २०१६ रोजीच्या पत्र क्रमांक २३७ च्या नोटिसीला दिनांक २४ मे २०१६ तसेच १० नोव्हेंबर २०१७ रोजी मनपाच्या नोटिसीला हरकत घेतली होती.
आयुक्त व प्रशासनास दिली होती माहिती
या प्रकरणी १८ डिसेंबर २०२० रोजी आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त अतिक्रमण ढवळे यांना वरील सर्व कागदपत्रे दाखवून त्यांना सदर कबरही ही अतिक्रमण अथवा अनधिकृत नाही. असे सांगितल्यावर त्यांनीसुद्धा मनपा यास अतिक्रमण अथवा अनधिकृत म्हणत नाही असे स्पष्ट केले होते.
रोड वाईंडिंगसाठी तीन मालकांनी दिले एन ओ सी
अस्तित्वातील त्या जागेवरील तीन मालकांनी शहराच्या विकासासाठी रोड वाईंडिंगसाठी एन ओ सी दिल्याने अस्तित्वातील जी कबर रस्त्याच्या आत होती. ती रस्ता रुंदीकरण करतांना बाहेर आली व ती काढणे आवश्यक असल्याने ते काढावे लागेल म्हणून गेलेल्या शिष्टमंडळाने सुद्धा सकारात्मक पवित्रा घेऊन शहराच्या विकासासाठी व रस्त्याला अडथळा होत असल्यामुळे यावर सर्वसामान्यपणे चर्चा करून, ट्रस्ट व दफन असलेल्या नातेवाईकास विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा असे ठरले होते.
सत्ताधारी च्या गटा च्या श्रेय वादा मुळे हे घडले
नगर सेवक मनोज काळे यांच्याशी १९ जानेवारी चर्चा होऊन एक दोन दिवसात यावर निर्णय होईल कारण बिपीन तडवी हे वंश नासिक येथे गेले होते. परंतु २१ जानेवारी ला सर्जिकल स्ट्राईक ही बातमी प्रसारित झाली.
१८ डिसेंम्बर च्या शिष्ट मंडळात यांचा होता समावेश
या शिष्टमंडळात ट्रस्ट चे उपाध्यक्ष नासिर खा तडवी, कबरचे वंशज बिपीन तडवी, मानियार बिरदारीचे फारुक शेख, इद गाह ट्रस्ट चेअनिस शाह, माजी नगरसेवक जाकिर पठाण, ट्रस्टचे शौकत खान, सईद शेख, फिरोज खान, शिव सेनेचे वसीम खान व आसिफ शाह हनिफ शाह हे उपस्थित होते.
महापौरांचा अनोखा न्याय
एकाच सर्वे मधील (खाजा मिया दर्गा परिसर) खरे अतिक्रमणास सात दिवसाची नोटीस तर अतिक्रमण नसलेल्या परंतु रस्त्याला अडथळा येणाऱ्या कबरीवर सर्जिकल स्ट्राइक करून अतिक्रमण काढले अशी बातमी प्रसिद्ध करणे म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्यासारखे होत आहे.
महापौर व प्रशासनास विनंती
या प्रकरणी मनपाच्या राजकीय नेत्यांनी, नगरसेवकांनी व माध्यम समूहांनी आपली जबाबदारी म्हणून योग्य ते शब्द उच्चारावे. आता खरे अतिक्रमण, बेसमेंट, तसेच धन दांडग्याचे व रस्त्याला अडथळे असणारे अतिक्रमण काढण्यास असेच सर्जिकल स्ट्राइक करावे व जळगावकरांना सुखद धक्का द्यावा असे आवाहन मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी केलेले आहे.