चाळीसगाव (प्रतिनिधी) फौजदार तसेच पोलीस कर्मचार्याने खटल्यात मदत करण्यासाठी ४हजार रूपयांची लाच स्वीकारतांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
एका ५५ वर्षाच्या व्यक्तीच्या मुलीला विवाहानंतर सासरी छळ असल्याने सासरच्या मंडळीच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मंगळावर दिनांक २८रोजी या खटल्यात आम्ही मदत करून यासाठी मुलीच्या वडिलांकडे सहायक फौजदार अनिल रामचंद्र अहिरे आणि पोलीस नाईक शैलेश आत्माराम पाटील यांनी पाच हजार रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर चार हजार रूपये देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत विभागाला कळवले असता एसीबीच्या पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली.
या सापळ्यात अनिल रामचंद्र अहीरे (वय-५२, सहा.फौजदार, नेम-चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन वर्ग-३ रा.वैष्णवी पार्क) आणि शैलेष आत्माराम पाटील (वय-३८,पोलीस नाईक, नेम-चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन वर्ग-३) यांना लाच घेतांना अटक करण्यात आली.