जळगाव (प्रतिनिधी) मेहरुण परिसरातील पीर सय्यद अली दर्ग्याजवळ किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यासंदर्भात जुबेर यासीन खाटीक (वय-३६ व्यवसाय- रिक्षा चालक, रा. सुप्रीम कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २२ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मी व माझा मित्र अशरफ शहा (रा. सुप्रीम कॉलनी) असे मेहरुण परिसरातील पीर सय्यद अली दर्ग्यामध्ये जहारतसाठी गेलो होतो. जहारत झाल्यानंतर आम्ही एका झाडाखाली बसलेले असताना जावेद शेख नामक तरुणाने मोटर सायकलची रेस वाढवून जोर जोरात आवाज करत होता. याबाबत त्याला अटक केल्यानंतर तो तेथून निघून गेला. त्यानंतर थोड्याच वेळात त्याने त्याच्या मित्रांना त्या ठिकाणी घेऊन आला. त्याचे मित्र मोहम्मद शोएब शेख सलीम,अमर हबीब तडवी, समीन शेख जावेद शेख या सर्वांनी मला मारहाण केली. तसेच गुप्तीच्या साह्याने वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु या वार चुकविण्याच्या प्रयत्नांत पोटाला व हाताच्या बोटाला जखम झाली आहे.
तर दुसर्या फिर्यादीत मोहम्मद शोयब शेख (वय २०, व्यवसाय मजुरी, रा. बिलाल चौक, तंबापुरा) यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी माझा मित्र कमल तडवी, मेहबूब तडवी, शब्बीर खान जावेद खान असे सय्यद अली दर्ग्यामध्ये जहारतसाठी गेलो होतो. तेथे दर्ग्यासमोर जुबेर खाटीक हा माझी आत्या शहनाज खान यांच्याशी भांडण करीत होता. भांडणाचा आवाज ऐकून मी व माझे मित्र हे भांडण सोडवण्यासाठी गेलो. परंतु या गोष्टीचा मला राग आला आणि त्याने हातातील लोखंडी पट्ट्याने माझ्या हातावर मारून दुखापत केली. तसेच त्याच्यासोबतचे अहमद शहा डबू शहा, जुबेरचा भाऊ बंड्या (पुर्ण नाव माहीत नाही), शब्बीर खाटीक गुलाब खाटीक अशांनी लाता-बुक्क्यांनी मला व जावेद खानला मारहाण करून शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्थानकात परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्या असून पुढील तपास एमआयडीसीपोलिस करीत आहे.