जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसी पोलिसांनी शहरातील कंजरवाडा भागात कारवाई करत गावठीची हातभट्टी नष्ट केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील कंजरवाड्यात एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून गावठी हातभट्टी दारू बनविण्याचे ३० हजार रूपये किंमतीचे कच्चे रसायन व साहित्य नष्ट केल. याप्रकरणी रंजना धिरज भाट (वय-३३) आणि योगेश महेश भाट (दोन्ही रा. सिंगापूर कंजरवाडा) या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, जितेंद्र राजपूत, मुदस्सर काझी, योगेश बारी, होगार्ड अजय चांदणे, ईश्वर पवार, रमेश वडर, राहुल पवार, होमगार्ड महिला कविता ताडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.