जळगाव (प्रतिनिधी) डॉ. प्रवीण मुंढे जळगावचे नवीन पोलीस अधीक्षक !पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर रत्नागिरी येथील डॉ. प्रवीण मुंढे यांना जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील असा अंदाज वर्तविला जात होता. गुरुवारी रात्री राज्य शासनाच्या गृह विभागाने बदलीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर रत्नागिरी येथील डॉ. प्रवीण मुंढे यांना जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. दरम्यान, डॉ. उगले यांनी २८ फेब्रुवारी २०१९ रोजी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी पदभार घेतला होता. त्यांच्या कार्यकाळात गंभीर गुन्ह्यांचा उलगडा झाला. तसेच लॉकडाऊनच्या काळात त्यांनी कायदा-व्यवस्था अत्यानात चोखपणे सांभाळली. याकाळात त्यांनी अवैध मद्यविक्री संदर्भात केलेली कारवाई राज्य पातळीवर गाजली. आता नवीन पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांच्यापुढे काही मोठे प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाचे आव्हान आहे.
रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असतांना डॉ. प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या इमारतीत कोरोना केअर सेंटर तयार करण्यात आले होते. या इमारतीतील २५ खोल्यांमध्ये ५० खाटांची सुसज्जता ठेवण्यात आली होती. कोरोनाग्रस्त असलेल्या व्यक्तीला शोधण्यात जिल्हा पोलीस अधीक्षकांचे मोठे योगदान असल्यामुळे अनेक रत्नागिरीकरांनी व्हॉट्सअॅप डिपीवर पोलीस डॉ. प्रवीण मुंढे यांचा फोटो ठेवला होता. दरम्यान, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांचे शिक्षण एमबीबीएस झाले आहे.