मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड आणि भाजप नेत्यांच ड्रग्स कनेक्शन नेमकं काय आहे? याबाबत एनसीबीने तपास केला नाही तर चार ते पाच दिवसात महाराष्ट्र पोलीस तपास सुरू करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
बॉलिवूड आणि भाजप नेत्यांच ड्रग्स कनेक्शन नेमकं काय आहे? याबाबत तपास सुरू आहे. भाजप नेत्यांच्या ड्रग कनेक्शनबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज दुसऱ्यांदा गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. एनसीबीने तपास केला नाही तर चार ते पाच दिवसात पोलिस तपास सुरू करणार, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. सावंत यांनी केलेली तक्रार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपासासाठी एनसीबीकडे पाठवली होती. मात्र एनसीबी याचा तपास का करत नाही, ते कुणाच्या दबावाखाली आहेत का? असा सवाल उपस्थित होत होता. सचिन सावंत यांनी दिलेली दुसरी तक्रारही आपण एनसीबीकडे तपासासाठी पाठवत आहोत, जर एनसीबीने तपास केला नाही तर पोलीस याचा तपास करतील अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.