तिरुअनंतपुरम (वृत्तसंस्था) करोना संक्रमित महिलेवर अॅम्बुलन्समध्ये बलात्कार केल्याची खळबळजनक घटना केरळमधील पाठनमथिट्टा जिल्ह्यात घडली आहे.
पीडित महिलेला करोनाची लागण झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी अॅम्बुलन्समधून नेण्यात येत होते. यावेळी अॅम्बुलन्स चालकाने सामसुम रस्ता दिसताच गाडी थांबवून बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. पीडित महिला रुग्णालयात पोहोचताच तिने घडलेला घटनाक्रम रुग्णालय कर्मचाऱ्यांना सांगितला. त्यानंतर पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अॅम्बुलन्स चालकाला अटक केली. आरोपी अॅम्बुलन्स चालकावर २०१९ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
















