बीड (वृत्तसंस्था) देशभर गाजलेल्या बीडमधील स्त्री भ्रूण हत्या प्रकरणातील मुख्य दोषी डॉ. सुदाम मुंडे डॉक्टर असलेल्या मुलीच्या नावाने स्वतः प्रॅक्टिस करत असल्याची धक्कादायक माहिती उघड समोर आली आहे. याप्रकरणी आज पहाटे परळीतील मुंडे हॉस्पिटलवर पोलिसांनी छापा टाकत सुदाम मुंडेला अटक केली आहे.
स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी देशभर गाजलेल्या प्रकरणातील मुख्य दोषी डॉ. सुदाम मुंडेची न्यायालयाने वैद्यकीय पदवी कायमस्वरुपी रद्द केली आहे. मात्र तरीही त्याच्याकडून पुन्हा प्रॅक्टिस सुरु होती. जिल्ह्यातील काही लोकांनी सुदाम मंडेच्या या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे तक्रार केली. यानंतर अखेर आज पहाटे पोलिसांनी परळीतील नंदागौळ रोडवरील मुंडे हॉस्पिटलवर छापा टाकला. गेल्या ६ महिन्यांपासून सुदाम मुंडे बिनधिक्कतपणे प्रॅक्टिस करत होता. या हॉस्पिटलचा परवाना मुंडे याच्या डॉक्टर मुलीच्या नावाने आहे.