धरणगाव (प्रतिनिधी) माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या कार्यालयात शनिवारी राष्ट्रवादीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
दि.19 रोजी शनिवार रोजी संध्याकाळी सात वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे. या मिटींगला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जिल्हाउपाध्यक्ष दीपकभाऊ वाघमारे हे संबोधित करणार आहे. या मीटिंगमध्ये आगामी नगरपरिषद निवडणूक तसेच धरणगाव शहर पाणीपुरवठा संदर्भात चर्चा होणार. या मिटिंगला सर्व राष्ट्रवादी व युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी शहराध्यक्ष निलेश चौधरी, युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे यांनी केले आहे.