अमळनेर (प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या दोघांना चोपड्यातून गावठी पिस्तुल घेऊन पळ काढताना अमळनेर पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. राजेश गणेश गुरखा (रा.शिरूड, ता.धुळे) आणि मलदरसिंग गुरुमुख सिंग शिकलकर (रा.साक्री रोड, धुळे),क अशी दोघां संशयितांची नावं आहेत.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, धुळे जिल्ह्यातील रहिवासी असणारे दोन जण हे गावठी कट्टा घेऊन जात आहेत. यानुसार पोलिसांनी सापळा रचला. परंतू संशयितांनी दुचाकीवरून पळ काढला. पोलिसांनी चोपडा रेल्वे गेटपासून आरोपींचा पाठलाग सुरू केला. शहरातील दगडी दरवाजात पोलिसांची व्हॅन अडकली. मात्र पोलिसांनी दोघांचा पाठलाग सुरुच ठेवला. अखेर दोघांना दोघांना अटक करण्यात असून त्यांच्याकडून कट्टा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रकाश सदगीर, हवालदार संजय पाटील, सुनील हटकर, दीपक माळी, डॉ.शरद पाटील, रवी पाटील, हितेश चिंचोरे, प्रमोद पाटील, कैलास शिंदे, भूषण बाविस्कर यांनी केली