धुळे प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, पिंपळनेर (ता.साक्री) येथील सहाय्यक अभियंता संजय कौतिक माळी (वय-५१) यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चार हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. दरम्यान या कारवाईचे पिंपळनेर शहरात स्वागत केले जात आहे.
पिंपळनेर शहरातील सटाणा रोड या भागातील एका ४३ वर्षीय व्यक्तीस नवीन घरगुती वापरासाठी नविन मीटर घेणे असल्याने त्यांना नवीन मिटर मिळून देण्यासाठी तक्रारदार यांच्या कडून आज वीज मीटर देण्याच्या मोबदल्यात ४ हजार रुपयांची सहाय्यक अभियंता संजय कौतिक माळी यांनी पंच साक्षीदार समक्ष केली. त्या अनुषंगाने सापळा रचून कारवाई केली असता,आरोपी सहाय्यक अभियंता संजय कौतिक माळी यांनी तक्रारदार यांचे कडून आज रोजी पंचांसमक्ष ४ हजार रुपये रक्कम स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी स्वीकारली. त्यामुळे पंच साक्षीदार समक्ष आरोपी लोकसेवक यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक सुनील कडासने,अपर पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी प्रकाश झोडगे, पोलिस निरीक्षक ला.प्र.वि.धुळे,सहा. सापळा अधिकारी मंजीतसिंग चव्हाण पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.धुळे पर्यवेक्षण अधिकारी,सुनील कुराडे पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि.धुळे,सापळा पथकात संदीप सरग,सुधीर सोनवणे, प्रशांत चौधरी,कृष्णकांत वाडीले, भुषण शेटे यांच्या पथकाने केली आहे.