जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे संचालक प्रमोद रायसोनी (अंकल) याच्यासह १३ संचालक व एक मॅनेजर अशा एकूण १४ जणांनी जिल्हा न्यायालयातील पहिले तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. हिवसे यांच्या न्यायालयात आज जामीन अर्ज दाखल केला होता. परंतू सरकारी वकील अॅड. केतन ढाके यांनी जामीन अर्जावर जोरदार आक्षेप घेत, आपले म्हणणे सादर केले. यावर पुढील सुनवाई २९ डिसेंबरला होणार आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे संचालक प्रमोद रायसोनी (अंकल) याच्यासह १३ संचालक व एक मॅनेजर अशा विरोधात ८ डिसेंबर रोजी दोषारोप सादर करण्यात आले होते. बीएचआरच्या विरोधात राज्यभरात ८१ पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यातील अमरावती, परभणी, लातूर, सांगली, व पुण्यात दाखल सात गुन्ह्यांमध्ये हे दोषारोप सादर करण्यात आले आहे. प्रमोद भाईचंद रायसोनी, दिलीप कांतीलाल चोरडीया, सुरजमल बभुतमल जैन, मोतीलाल ओंकार जीरी, यशवंत ओंकार जीरी, राजाराम काशिनाथ कोळी, इंद्रकुमार आत्माराम ललवाणी, डॉ. हितेंद्र यशवंत महाजन, भागवत संपत माळी, दादा रामचंद्र पाटील, शेख रमजान शेख अब्दुल नबी, भगवान हिरामण वाघ, सुकलाल शहादू माळी, लिलाबाई राजू सोनवणे अशांनी आज न्यायालयात आज जामीन अर्ज दाखल केला. परंतू सरकारी वकील अॅड. केतन ढाके यांनी जामीन अर्जावर जोरदार आक्षेप घेत संशयितांविरुद्धच्या ६१ गुन्ह्यांमध्ये आपले म्हणणे सादर केले. तसेच संबंधीतांवर हा मोठ्या स्वरूपाचा आर्थिक गुन्हा आहे. एकूण ८१ गुन्हे आहेत. यातील काही गुन्ह्यांचा तपास सुरु असून चार्जशीट देखील दाखल करण्यात आलेले नाही. यापूर्वी संशयितांचे अर्ज हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने फेटाळलेले आहे.
त्यामुळे सर्वांचा जामीन अर्ज नामंजूर करावा, असा युक्तिवाद श्री. ढाके यांनी केला. दरम्यान, यावर आता २९ डिसेंबर रोजी सुनवाई होणार आहे. यासंदर्भात परभणीतील सेलू व नालनपेठ पोलिस ठाणे, अमरावती येथील खोलापुरी व राजापेठ पोलिस ठाणे, सांगली पोलिस ठाणे, सांगली, उदगीर पोलिस ठाणे, लातूर व खडकी पोलिस ठाणे, पुणे येथे गुन्हा दाखल आहेत.