जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टिस्टेट स्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची नगरमधील सावेडी शाखेची हार्डडिक्स जप्त करण्यासाठी नगर सीआयडीचे पथक मंगळवारी जळगाव दाखल झाले होते. मात्र, या पथकाला हार्डडिस्कमधील डेटा कॉपी करून सीआयडी देण्यात आला.
बीएचआर सावेडी शाखेच्या गैरव्यवहार प्रकरणी नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या शाखेचा डेटा असलेली हार्डडिस्क जप्त करण्यासाठी मंगळवारी दुपारी नगर सीआयडीचे पथक एमआयडीसी परिसरातील बीएचआरच्या मुख्य कार्यालयात आले होते. मात्र, त्यांना हार्डडिस्क देण्यात आली नाही. त्यातील डेटा हा कॉपी करून त्यांना देण्यात आला. एवढेच नव्हे तर इतर काही गोष्टींची माहिती देखील सीआयडीच्या पथकाने घेतली. दरम्यान, बीएचआर घोटाळ्यासंबंधी पुण्यासह विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेने काही महिन्यांपूर्वी जळगावात बीएचआरच्या जळगावातील मुख्य कार्यालयावर छापा टाकून महत्त्वाची कागदपत्र, संगणक जप्त केले होते. तसेच अनेकांनी टप्प्याटप्प्याने अटक देखील केली होती.















