बोदवड (प्रतिनिधी) येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागात असलेला माजी मंत्री एकनाथराव खडे यांचा फोटो काढण्यासंदर्भात युवा सेनेच्या वतीने मंगळवारी गटविकास अधिकार्यांना निवेदन दिल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात खडसेंचा फोटो हटविण्यात आला.
ग्रामविकास विभागाच्या परीपत्रकानुसार शासकीय कार्यालयात जिल्हास्तरीय वा राज्यस्तरीय राजकीय व्यक्तींचे फोटो लावण्यास प्रतिबंध घालण्यात आला असतांना बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयातील शाखा अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे बांधकाम विभागात राजकिय व्यक्ती म्हणून माजी मंत्री एकनाथ खडसेंचा फोटो असल्याने ग्रामविकास विभागाच्या परीपत्रकाचे उल्लंघन झाले असून हा फोटो तत्काळ काढण्यात यावा अन्यथा येत्या दोन दिवसांत युवा सेनेकडून हा फोटो काढण्यात येईल,असे निवेदन देताच अवघ्या पाच मिनिटांत तो फोटो हटवण्यात आला.दरम्यान, बांधकाम विभागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो महापुरुषांच्या रांगेत लावावा तसेच खडसेंचा फोटो काढण्यात यावा अन्यथा युवा सेनेतर्फे राजकिय व्यक्तीचा शिवसेना स्टाईल फोटो काढून ’छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो महापुरुषांच्या रांगेत सन्मानपूर्वक लावण्यात येईल तसेच प्रशासकिय स्तरावर निवेदनाची दखल न घेतल्यास येत्या दोन दिवसांत शिवसेना युवासेना स्टाईल आंदोलन करुन फोटो काढण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले.या पार्श्वभूमीवर माजी आमदार खडसेंचा फोटो काढण्यात आला असून येत्या दोन दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो महापुरुषांच्या रांगेत न लावल्यास शिवसेना युवासेना सन्मानपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करत फोटो बांधकाम विभागात लावणार असल्याचे युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे म्हणाले.
निवेदन देतांना युवासेना उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे, शिवसेना तालुका संघटक शांताराम कोळी,शहरप्रमुख हर्षल बडगुजर,संजय महाजन, अल्पसंख्यांक उपजिल्हा संघटक कलिम शेख,तालुका समन्वयक अमोल व्यवहारे,दीपक माळी, नईम खान,योगेश राजपूत, अमोल पाटील,धनराज पाटील, अमोल जुंबळे यांच्यासमवेत अन्य शिवसैनिक उपस्थित होते.