धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव ते पिंप्री दरम्यान आज सायंकाळी बोलेरो आणि स्विफ्ट डिझायर यांची समोरासमोर धडक झाल्याने पाच ते सहा जण जखमी झाले आहेत.
बोलेरो मधील कार्यकर्ते एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे कळते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ जखमींना जळगाव येथे रवाना केले. जखमीमध्ये कोणीही अधिकचे गंभीर नसल्याची ही माहिती समोर येत आहे. जखमींना तात्काळ जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात तसेच काहींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे कळते. जखमींची नावे अद्याप करू शकली नव्हती.