भुसावळ (प्रतिनिधी) रेल्वेत नौकरी लावून देण्यासह लग्नाचे आमिष दाखवून रेल्वे स्टेशन प्रबंधकाकडून तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस स्थानकात अंकुश किरण मोरे (वय ३४ नौ. सावदा रेल्वे स्टेशन प्रबंधक, रा. गणेश कॉलनी मरीमाता मंदिरा मागे) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी अंकुश किरण मोरे याने दि. ४ डिसेंबर २०१७ रोजी त्याच्या बहिण्याच्या लग्नात ओळख करून तिचा मोबाईल नंबर घेतला होता. त्यानंतर त्याने पिडीतेसोबत संपर्क मैत्री केली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात केल्यानंतर त्याने पिडीत तरुणीला भारतीय रेल्वे विभागात नोकरी लावून देतो आणि तुझ्या सोबत लग्न करतो, असे अमिष दाखवले. त्यानंतर ३१ मार्च २०१८ रोजी पिडीतेला घरी नेले आणि इच्छेविरुद्ध लैंगिक शाररीक संबंध प्रस्थापीत करत लैंगिक शोषण केले. काही दिवसांनी परत अंकुश याने पिडीतेसोबत शाररीक संबंध प्रस्थापीत करण्याची ईच्छा प्रकट केली. पिडीतेने नकार दिल्यावर त्याने पिडीतेसोबत संपर्कच तोडला आणि लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी अंकुश मोरे विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउप निरीक्षक अंबादास पाथरवट हे करीत आहेत.