बुलडाणा (प्रतिनिधी) एकनाथराव खडसेंविरुद्ध विविध आरोप करणारा कथित हॅकर मनिष भंगाळे विरुद्ध बुलडाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. खडसेंचे समर्थक माधव पाटील यांनी तक्रार दिली आहे.
माधव पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे की, एकनाथराव खडसे यांच्या राजकीय द्वेषातून कुणाच्या तरी सांगण्या वरून खडसे यांना बदनाम करण्यासाठी मनीष भंगाळे याने खडसेंच्या विरोधात आरोप करण्यात आला आहे. मनीष भंगाळे विरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची माधव पाटील यांनी मागणी केली आहे. दरम्यान, याबाबत खडसे म्हणाले, मनीष भंगाळेने माझ्या विरोधात खोटे आरोप केले होते. दाऊद इब्राहिमच्या बायकोबरोबर माझे संभाषण झाले, असा आरोप त्याने केला होता. जळगावमध्ये त्याच्या विरोधात तक्रारी दाखल आहेत. हॅकिंग करुन एटीएममधून पैसे काढून घेऊन लोकांची लुबाडणूक करण्याचा त्याच्यावर आरोप आहे. मात्र, जळगाव पोलिसांनी अद्यापर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. जळगावच्या रामानंद पोलिसांनी एकप्रकारे भंगाळेला संरक्षण दिले आहे. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्याने भंगाळे विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.