मुंबई (वृत्तसंस्था) मास्क, व्हेंटीलेटर, पीपीई किट देणार नाही असे केंद्राचे पत्र आले आहे. केंद्राने पूर्णतः पाठिंबा काढून घेणे योग्य नसल्याचे म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे पुढे म्हणाले की, काल प्रकाश जावडेकर यांच्याशी बोलणे झाले आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री आणि पंतप्रधानांना राज्य सरकार पत्र लिहिणार आहे. १५ सप्टेंबरपासून स्वस्थ महाराष्ट्र मोहीम राबवली जाणार असल्याचे ते म्हणाले. यात ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर भर दिला जाणार आहे. अनलॉक करतोय, जिल्हा बंदी उठवली, ई पास बंद केले, कार्यालयातील उपस्थित वाढवली आहे त्यामुळे संसर्ग वाढतोय असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले. मास्क घातला नाही तर दंड आहे, तरीही २५ ते ३० टक्के लोक मास्क वापरत नाहीत. एकट्या पुण्यात मास्क घातला नाही म्हणून आतापर्यंत १ कोटी दंड वसूल केल्याचेही ते म्हणाले.