धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळातर्फे नवरात्रातील रथवहनोत्सव मिरवणूक वाजंत्रीच्या वेळे संदर्भात सकारात्मक विचार करणार, असे आश्वासन ना. गुलाबराव पाटील यांनी दिले.
श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डी.आर पाटील सर, मंडळाचे कार्याध्यक्ष जिवनसिंह बयस, मंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर महाजन, कमलेश तिवारी, भानुदास विसावे, सचिव प्रशांत वाणी, कोषाध्यक्ष किरण वाणी, अरूण महाले यांनी या संदर्भात ना. पाटील यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन मारूती,दुर्गादेवी व रथाच्या दिवशी रात्रभर वाजंत्री व मिरवणूकीची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन दिले. आपल्या देशात कायदा सर्वोच्च आहे. म.सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करून धरणगाव येथील थोर परंपरा असलेल्या वहनोत्सवात मारूती,दुर्गादेवी व रथाच्या दिवशी रात्रभर मिरवणुकीच्या परवानगीसाठी शिंदे सरकार सकारात्मक विचार करेल, हा प्रश्न केवळ धरणगाव नाही तर संपूर्ण राज्याचा असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याशी आज चर्चा करून मार्ग काढला जाईल, असेही ना. गुलाबराव पाटील यांनी सांगीतले.