एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील खर्ची येथील शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. वाल्मीक भागवत मराठे (वय ३६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
खर्ची येथील शेतकरी वाल्मीक भागवत मराठे हे २२ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आपल्या शेतात फवारणी करत होते. यावेळी त्यांना अचानक शॉक लागला. नातेवाइकांनी त्यांना तातडीने जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सीएमओ डॉ.रूपाली बाविस्कर यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.