लंडन (वृत्तसंस्था) एका ९९ वर्षीय महिलेवर (Rape on 99 Years old Woman) तिची देखभाल करणाऱ्या व्यक्तीनेच वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना लंडनमध्ये घडली आहे.
मिररच्या वृत्तानुसार, पीडित महिला डिमेंशियाचा सामना करत आहे आणि उपचारासाठी ब्लॅकपूल केअर होममध्ये राहाते. मागील काही दिवसांपासून तिच्या वागण्यात बदल जाणवत होता. ती कोणालाही जवळ येऊ देत नव्हती. कोणी तिला हात लावला तर ती घाबरत असे. इतकंच नाही तर ती कुटुंबातील सदस्यांनाही तिथून निघून जाण्यास सांगत असे. त्यामुळे महिलेच्या नातेवाईकाने सांगितलं की ‘महिलेच्या वागण्यात एकदम झालेला हा बदल पाहून आम्ही चिंतेत होतो. आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं, की अखेर याचं कारण काय आहे. यासाठी आम्ही तिच्या रूममध्ये सिक्रेट कॅमेरा लावला. नंतर आम्ही जेव्हा फुटेज पाहिलं, तेव्हा हैराण झालो. आम्ही कधीच विचार केला नव्हता की एका वृद्धा आजारी महिलेसोबत असं काही घडू शकतं. ४८ वर्षीय फिलिप कॅरीचं घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं होतं. यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. फुटेज आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे फिलिप कॅरीला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.