हाथरस (वृत्तसंस्था) दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पीटलमधील तीन डॉक्टरांच्या पॅनलने तसेच उत्तर प्रदेश पोलिसांनी पिडीत तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचा दावा केला आहे.
हॉस्पीटलच्या तीन डॉक्टरांच्या पॅनेलने दावा केला आहे की, तरुणीवर बलात्कार झाला नाही. तरुणीच्या प्रायवेट पार्टमध्ये पीरियडचे लक्षण आढळले आहेत, बलात्काराचे नाही. डॉक्टरांनी सांगितले की, तरुणीचा गळा दाबण्यात आला आहे, पण मृत्यूचे नमके कारण जाणून घेण्यासाठी विसरा प्रिजर्व केला आहे. तर दुसरीकडे घटनेनंतर तरुणीने पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला होता. आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचं तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. आपल्याल फक्त मारहाण झाल्याचा आरोप तिने केला होता. काही लोक सामाजिक सौहार्द बिघडवण्यासाठी आणि जातीय हिंसाचार भडकवण्यासाठी वस्तुस्थिती चुकीच्या पद्धतीने मांडत आहेत. हाथरस प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशचे अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी दिली आहे.