जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नवी पेठ महात्मा गांधी रोड भारत एजन्सी दुकानातून १ लाख २० हजार ०६० रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात प्रवीण उर्फ अनिल भिकमचंद लाठी व समाधान हिलाल धनगर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
यासंदर्भात गोपाल काशिनाथ पलोड (वय, रा. ११ सिटी स्केअर अपार्टमेंट प्लॉट नं ९/१० तिसरा मजला जळगाव पीपल बँक मागे रिंग रोड जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ५ एप्रिल २०२२ रोजी प्रवीण उर्फ अनिल भिकमचंद लाठी (वय ४१, रा. शाहुनगर जळगाव) व समाधान हिलाल धनगर (वय ३२, रा. आसोदा ता. जि. जळगाव) यांनी २७० SKF कंपनीच्या बेरिंग, १०० ग्रॅम वजनाचे पतंजलि दूध बिस्किट, १०० ग्रॅम वजनाचे मारी व पतंजलि दूध बिस्किट, ५०० ग्रॅम वजनाचे पतंजलि तूप, पतंजलि दंतक्रांती टूथपेस्ट, असा एकूण १ लाख २० हजार ०६० रुपयांचा मुद्देमाल हा चोरुन महिद्रा जितो लाल रंगाची गाडी क्र MH१९CY-१९०५ हिच्यात भरुन चोरुन नेला. जळगाव शहर पोलीस ठाण्यात प्रवीण उर्फ अनिल भिकमचंद लाठी व समाधान हिलाल धनगर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विजय आनंदा करीत आहेत.
















