मुंबई (वृत्तसंस्था) संपूर्ण देशाला हादरावून सोडणाऱ्या भंडारा जिल्हा रुग्णालयातील १० नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. चौकशी समितीने दिलेल्या अहवालात २ परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे १० चिमुरड्यांचा बळी गेला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालावर चर्चा होणार आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला चटका लावणाऱ्या भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीचा अहवाल समोर आला आहे. ९ जानेवारी रोजी रुग्णालायत नवजात शिशू युनिटमध्ये लागलेल्या या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला होता. संपूर्ण राज्य सुन्न करणाऱ्या या आगीच्या घटनेसाठी शॉर्ट सर्किटचं कारण देण्यात आलं आहे. तपास अधिकाऱ्यांनी ५० पानांचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये दोन परिचारकांच्या बेजबाबदारपणामुळे आग लागल्याचं नमूद करण्यात आलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालावर चर्चा होणार आहे. भंडारा रुग्णालयातील आगीनंतर नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमण्यात आली आहे. त्यांनी हा ५० पानांचा अहवाल सादर केला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज घडना घडली त्यावेळी वर्तवण्यात आला होता. अहवालातही शॉर्ट सर्किटचाच उल्लेख करण्यात आला आहे. तसंच रुग्णालयात स्टाफ कमी होता. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आग लागली त्यावेळी तिथे कोणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळे या घटनेबाबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे बोट दाखवण्यात आलं आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या SNCU मध्ये एकूण १७ नवजात बालक दाखल होती. शनिवार ९ जानेवारी २०२१ च्या मध्यरात्री जवळपास २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले ड्युटीवर असलेल्या परिचारिकेने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNIC मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बाळ वाचविण्यात आले तर औट बॉल युनिटमधील १० मुलांचा मृत्यू झाला. राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.