धरणगाव (प्रतिनिधी) : मुंबई येथील बीकेसी मैदानावर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबई येथील बीकेसी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे या मैदानावर धरणगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील दहा हजार शिवसैनिक मेळाव्याला जाणार असून या राज्याचे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव जी पाटील साहेब व युवा नेते प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील युवा सैनिक शिवसैनिक महिला आघाडी ग्रंथालय सेना वकील संघटना नगरसेवक पदाधिकारी यांच्या बैठकींचे नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती जळगाव जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रवक्ते पी एम पाटील सर यांनी दिली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिंदे सेना पूर्ण महाराष्ट्रात आपले विचार कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत असून मुंबई येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात महाराष्ट्राचे बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते मुलुख मैदान तोफ धडाडणार असून गुलाबराव पाटील काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने मेळाव्याच्या तयारीला लागले असून थोड्याच दिवसात धरणगाव तालुक्यात राजकीय भूकंप होणार असून अनेक कार्यकर्ते गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत काम करण्यासाठी इच्छुक आहेत 4 तारखेला दुपारी मेळाव्यासाठी कार्यकर्ते निघणार असून वनी येथील देवीच्या गडाचे दर्शन घेऊन 5 तारखेला बहुसंख्यणे मेळावाला कार्यकर्ते उपस्थित राहतील व मेळावा मोठ्या उत्साहाने पार पडेल. पी एम पाटील सर धरणगाव जळगाव.