भोपाल (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशात झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व ११ कामगार महाराष्ट्रातील होते.
मध्य प्रदेशातील बैतुल येथे रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे. बैतुल जिल्ह्यात परिसरात बस आणि कारची समोरासमोर धडक बसली. यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातात मृत्यू झालेल्या कामगार हे महाराष्ट्रातील अमरावती येथे निघाले होते. रात्री २ वाजता बसने त्यांच्या एसयुव्हीला धडक दिली. मात्र, ही धडक इतकी जोरत होती की कारचा चेंदामेंदा झाला आहे. पोलिसांना कारचा पत्रा कापून काही मृतदेह बाहेर काढावे लागले आहेत.