जळगाव (प्रतिनिधी) खोटी बिले देऊन शासनाची कर चुकविणाऱ्या चोपडा शहरातील स्वामी ट्रेडिंग कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आले आहे. त्याने शासनाचा १२ कोटी ६५ लाख रूपयांचा जीएसटी कर चुकविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विभागाने गुरूवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता अटक केल्याची, माहिती वस्तू व सेवाकर विभागाचे राज्यकर उपायुक्त सुर्यकांत कुमावत यांनी दिलेल्या प्रसिध्दीत्रकान्वये कळविले आहे. नामदेव दौलत धनगर (रा. चोपडा), असे अटक केलेल्या कंपनीच्या मालकाचे नाव आहे.
चोपडा येथील स्वामी ट्रेडिंग कंपनी या प्रकरणामध्ये मालक नामदेव दौलत धनगर यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता तब्बल ६५ कोटीची खोटी बिले देऊन शासनाची १२ कोटी ६५ लाख रूपयांची कर चुकविल्याचे समोर आले आहे. धनगर यांनी कमिशन मिळवण्यासाठी जिल्ह्यास्त राज्यातील विविध ठिकाणच्या ९० मक्तेदारांना सिमेंटचा पुरवठा केल्याची ६४.७१ कोटी रुपयांची बनावट बिले दिली. त्यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियमच्या तरतुदीचे उल्लंघन केले असल्यामुळे नामदेव दौलत धनगर यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागा अन्वेषण शाखेने गुरूवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता अटक केली आहे. ही कारवाई जळगावचे राज्यकर सहआयुक्त सुभाष भवर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्युक्त सुर्यकांत कुमावत यांच्या नेतृत्वात सहाय्यक आयुक्त माहुल इंदाणी, रामलाल पाटील, राज्यकर निरीक्षक प्रशांत रौंदळ, संदीप पाटील, योगेश कानडे, स्वप्नील पाटील, दीपक पाटील, सिद्दार्थ मोरे, संध्या वाकडे, श्वेता बागुल, परमेश्वर इंगळे यांनी केली आहे.