जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा पोलिस दलातील १२ अधिकारी, कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक जाहीर झाले आहे.
उत्तम कामगिरी प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक, शौर्य पदक, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह सन २०२२ वर्षाकरिता पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी बुधवारी जाहीर केले. पोलिस उपनिरीक्षक, विनयकुमार भीमराव देसले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय हरिदास पवार, नरेंद्र हिरालाल कुमावत, पोलिस हवालदार सचिन सुभाष विसपुते, सुनील अर्जुन माळी, मनोज काशिनाथ जोशी, राजेश प्रभाकर चौधरी, सुनील माधव शिरसाठ, रवींद्र बोंडू घुगे, विजय अशोक दुसाने, पोलिस नाईक अल्ताफ सत्तार मन्सुरी, अमोल भारत विसपुते यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.