जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर मंगळवारी सरकारपक्षाकडून युक्तीवाद करण्यात आला. या जामीन अर्जावर १२८ महिलांच्या स्वाक्षरीद्वारे हरकत दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सुनावणी ही दि. ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. बकाले यांनी या पूर्वी जिल्हा सत्र न्यायालय व खंडपीठात अटकपूर्व जामीना अर्ज दाखल केला होता. परंतु त्याचा जामीन अर्ज नामंजूर झाला आहे. त्यानंतर देखील बकाले यांनी अटकपूर्व जामीनासाठी पुन्हा सत्र न्यायालयात दि. २१ ऑक्टोंबर रोजी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर दि. ३१ ऑक्टोबर रोजी युक्तीवाद होणार असल्याने न्यायालय परिसरात महिला मोठ्या संख्येने महिला हजर होत्या.
सत्र न्यायाधीश बी. एस. वावरे यांच्या न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील रमाकांत सोनवणे यांनी युक्तीवाद केला. पुढील सुनावणी आता १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. बकाले यांच्या जामिन अर्जावर सरकार पक्षातर्फे युक्तीवाद करताना अॅड. रमाकांत सोनवणे यांनी बकाले हे ४२ / अ ची नोटीस मिळालेली नसताना खोटे सांगत नोटीस मिळाल्याचे सांगून दिशाभूल करीत आहेत, त्यांच्या आवाजाचे नमुने घेणे बाकी आहे, या पूर्वी जामिन अर्ज रद्द केला त्या वेळी जी परिस्थिती होती, तीच आताही आहे, त्यामुळे बकाले यांचा जामीन अर्ज रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.
१२८ महिलांच्या सह्यांचे पत्र न्यायालयात दाखल !
महिलांसंदर्भात अश्लील संभाषण असलेला हा गुन्हा असल्याने महिलांच्यावतीने हरकत दाखल करण्यासाठी मुदत मागण्यात आली होती. दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत मिळालेल्या या मुदतीनुसार मंगळवारी १२८ महिलांच्या सह्यांसह अँड. गोपाळ जळमकर यांनी हरकत दाखल केली आहे. या प्रसंगी न्यायालय परिसरात मराठा महासंघाचे सुरेंद्र पाटील, राम पवार, अॅड. कुणाल पवार, अॅड. सचिन पाटील, अॅड. राहुल अकोलकर, अॅड. अजय पाटील, अॅड. संदीप पाटील, अॅड. नीतेश महाजन यांच्यासह मराठा समाजाचे वकील व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.