अमळनेर (प्रतिनिधी) येथील पाडळसरे धरणासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात १३५ कोटींचा भरीव निधी प्राप्त करून घेतला म्हणून पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने आमदार अनिल पाटील यांचे अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वागत करून सत्कार करण्यात आला.
अर्थसंकल्पिय अधिवेशनातून अमळनेर येथे गुरुवारी आ. अनिल पाटील परतले. रेल्वे स्थानकावर यावेळी टोप्या घातलेले पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी आ. अनिल पाटील यांचा सत्कार समितीच्या कार्यकर्त्यांनी केला. याप्रसंगी बोलतांना समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी धरणाच्या २० वर्षाच्या इतिहासात अशी एकरकमी भरीव तरतूद झालेली नव्हती. आघाडी सरकारने कठीण काळात धरणाला पैसा दिला आहे. आमदार अनिल पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना धरणावर आणून केलेल्या यशस्वी प्रयत्नांचे हे फळ आहे, असे त्यांनी सांगितले.
तर सत्काराला उत्तर देतांना आ. अनिल पाटील यांनी सांगितले की, ‘जळगावच्या पश्चिम भागाच्या विकासासाठी सदरचा प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक असल्याचे माझे आग्रही म्हणणे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लक्षात घेतल्याने माझ्या प्रयत्नांना यश आले आहे.
डिसेंबर पर्यंत सदरचा जाहिर १३५ कोटींचा निधी खर्च झाल्यास आपण अजून ५० कोटींची पुरवणी मागणी करणार आहोत! हे यश केवळ माझे नसून जनआंदोलन समिती, पक्षाचे कार्यकर्ते व जनतेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी, प्रशांत भदाणे, प्रा. सुनील पाटील, देविदास देसले, योगेश पाटील, महेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, डी. एम. पाटील, रविंद पाटील, वसुंधरा लांडगे, प्रतिभा पाटील, ऍड. तिलोतमा पाटील, रामराव पवार, श्रावण पाटील, सुपडू बैसाने आदिंसह जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदारांच स्वागत आणि गौरव
जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, प्रदेश ग्रंथालय पदाधिकारी रिता बाविस्कर, कार्याध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, रणजित पाटील, राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, विनोद जाधव, हेमंत पवार, अर्बन बँक व्हॉईस चेअरमन प्रवीण पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी महिला जिल्हा सरचिटणीस कविता पवार, तालुकाध्यक्षा योजना पाटील, शहराध्यक्षा आशा चावरीया, विनोद कदम, प्रविण पाटील, गणेश भामरे, गौरव पाटील, बाळु पाटील, भुषण भदाणे, आशा शिंदे, भावना देसले, भारती शिंदे, अलका गोसावी, अनिता भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष गोविंदा बाविस्कर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे, युवक शहराध्यक्ष निलेश देशमुख, सचिन बेहरे, प्रदीप पाटील, महेश पाटील, निनाद शिसोदे, दर्पण वाघ, शुभम पाटील, अनिरुद्ध शिसोदे, कल्पेश गुजराथी, यतीन पवार, अमोल पाटील, पंकज पाटील, उमेश पाटील, असिफ पिंजारी, पप्पू कलोसे, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
















