नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गुजरातमधील गीर सोमनाथमध्ये काल रात्री सतत पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे १३ ते १५ बोटी समुद्रात बुडण्याची भीती आहे. या बोटीत अनेक मच्छीमारही होते. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीतील ८ ते १० मच्छीमार अजूनही बेपत्ता आहेत.
महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागात कालपासूनच सतत्याने पाऊस सुरू आहे आणि IMD नुसार येत्या ४८ तासांत येथे मुसळधार पाऊस पडू शकतो. यासोबतच मच्छीमारांनाही ५ दिवसांचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, ओडिशा आणि आंध्रला ‘जवाद’ या चक्रिवादळाचा धोकाही आहे. अहमदाबादेत IMD च्या क्षेत्रीय निदेशक मनोरमा मोहंती यांनी म्हटले होते, की गुजरातेत ३० नोव्हेंबरपासून पाऊस सुरू होईल. याच बरोबर ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत मच्छीमारांना उत्तर आणि दक्षिण गुजरातच्या किनारी भागासाठीही इशारा देण्यात आला आहे.