चोपडा प्रतिनिधी – भारताच्या पहिल्या शिक्षिका , स्त्री मुक्ती – शिक्षण व भारतीय महिलांच्या उध्दारासाठी म . फुलें सोबत जीवन सर्वस्व वाहणाऱ्या , स्त्रियांना ज्ञानाची कवाडे उघडणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या १९३ व्या जयंती दिनी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख यांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले . या वेळी फेस्कॉमचे तालुका सचिव शांताराम पाटील व ज्येष्ठ नागरिक संघ सचिव विलास पाटील सर यांनी सावित्री बाई फुलेंच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत त्यांना भावपूर्ण अभिवादन केले .
या प्रसंगी माजी अध्यक्ष व्ही . एच . करोडपती , कोषाध्यक्ष दिलीपराव पाटील व सदस्य उपस्थित होते .