TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाटणादेवीच्या गळ्यात २० कोटींच्या विकासनिधीची माळ ; आ. मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश !

नवरात्रोत्सवाच्या पर्वणीवर तालुकावासियांनी अनोखी भेट !

vijay waghmare by vijay waghmare
October 1, 2024
in चाळीसगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील मुलभूत सुविधांसाठीच नाही तर सांस्कृतिक, धार्मिक व पर्यटन विकासासाठीही हजारो कोटींच्या विकास निधीचा ओघ वाहत ठेवणा-या आ. मंगेश चव्हाण यांनी पाटणादेवी परिसराच्या वैविध्यपूर्ण विकासासाठी २० कोटी रुपयांचा निधी मिळवित तालुकावासियांना नवरात्रोत्सवाच्या पर्वणीवर अनोखी भेट दिली आहे. यामुळे या पुरातन तीर्थ व पर्यटनक्षेत्राचा कायापालट होणार आहे. खान्देशातील एक प्रमुख धार्मिक व पर्यटन क्षेत्र असा यास्थळाचा लौकीक असून तो अजून वाढणार आहे.

पाटणादेवी हे चाळीसगाव तालुकावासियांचेच नव्हे तर अवघ्या खान्देशवासियांचेही कुलदैवत आहे. नवसाला पावणारी असे माता चंडिकेचे अधिष्ठान असून थोर गणितीतज्ञ भास्कराचार्य यांची ही तपोभूमी आहे. पुराणकाळापासूनच यापरिसराचे मोठे वैशिष्ट्ये राहिले आहे. निसर्ग व प्राणी, पक्षी संपदेने हा परिसर सुजलाम – सुफलाम आहे. येथे गणितनगरी साकारण्याची स्वप्ने काहींनी दाखवली. मात्र गणित नगरीच्या नावाने एक वीटही त्यांना ठेवता आली नाही. राजकारण मात्र १० वर्ष केले. ही वस्तूस्थिती असून गेल्या अनेक वर्षात पाटणादेवी तीर्थक्षेत्राचा शाश्वत विकासासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच निधी मिळविण्यात आ. चव्हाण यशस्वी ठरले आहे. निधी मंजूर झाल्याने भाविकांसह पर्यटन, पर्यारवणप्रेमी व खगोल अभ्यासकांनी आनंद व्यक्त केला आहे.

READ ALSO

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

भास्कराचार्यांच्या जीवनप्रवासाला नाविन्यपूर्ण साज, जीवनदर्शन केंद्र उभारणार !

थोर गणितीतज्ञ भास्कराचार्य यांचा जन्म पाटणा येथे झाल्याचे अनेक दाखले उपलब्ध आहे. भास्कराचार्यांनी या तपोभूमीत अनेकविध गणितीग्रंथांचा अविष्कार केला. ग्रहांचा अभ्यासही त्यांनी येथे केला असून त्यांची ही मौलिक ग्रंथसंपदा आजही खगोल अभ्यासकांना दिशा देत असते.

1…भास्कराचार्य यांचे नातू चंगदेव यांनी १२व्या शतकात त्यांच्या वंशावळीचा शिलालेख कोरुन ठेवला आहे.

2…हा शिलालेख येथील देवी मंदिरात उपलब्ध असून यामुळेच भास्कराचार्य यांच्या जन्म पाटणा येथेच झाला असून येथे त्यांनी तपसाधना केली आहे. याला पुष्टी मिळते.

3…भास्कराचार्य यांचा जीवनप्रवास, तपोसाधना, ग्रंथनिर्मिती हा कुतूहलाचा विषय आहे. पाटणा येथे भास्कराचार्य इनोव्हेटीव्ह सेंटर उभारण्यात येणार आहे. यात त्यांचा जीवनप्रवास मांडण्यात येणार आहे. यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

भक्त निवासही उभारणार :

पाटणादेवीचे स्थान महात्म्य लक्षात घेऊन भाविकांसाठी भक्त निवास उभारण्यात येणार आहे. यासाठीही ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासोबतच भास्कराचार्य इनोव्हेटीव्ह सेंटच्या तळमजल्याचे बांधकामासाठी ५ कोटी तर पहिल्या मजल्याच्या उभारणीसाठी ५ कोटी अशा एकुण २० कोटी रुपयांचा विकास कामांना पर्यटन व सांस्कृतिक विभागाने २४ रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

पाटणादेवी हे समस्त खान्देशवासियांचे अराध्य दैवत असले तरी, चाळीसगाववासियांचेही जागृत देवस्थान आहे. याक्षेत्राचा धार्मिक व पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्याचा संकल्प केला आहे. काहींनी देवीच्या नावाने राजकारणाचा जोगवा मागितला. गणित नगरीचे इमले रचले. प्रत्यक्षात एक छदामही विकासनिधी ते आणू शकले नाही. गेल्यावर्षी भाविकांची गैरसोय थांबविण्यासाठी स्वखर्चाने डोंगरी नदीवर पूल उभारला. देवीचे महात्म्य दर्शवणारी सजावट मंदिर परिसराला केली. याचे चाळीसगाववासियांसोबतचं राज्यभरातून आलेल्या भाविकांनी स्वागत केले. पाटणादेवी परिसर हा एक सांस्कृतिक व धार्मिक वारसा असून तो जपण्यासाठी नेहमीचं अग्रभागी राहणार आहे. पाटणादेवीच्या पर्यटनविकासासाठी पहिल्या टप्प्यात भरघोस असा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पर्यटन व ग्रामविकास मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन व भाजपा महायुती सरकारचे जाहीर आभार मानतो.
-आ. मंगेश चव्हाण !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

‘चहेलम’ ऐवजी मुलींच्या मदरशात दान ; पत्नीच्या विरहात मुस्लीम युवकाचा आदर्श !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, १ झाला बरा !

October 25, 2021

गळा चिरलेला व डाव्या पायाची बोटे कापलेल्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह !

May 31, 2024

कारागिराच्या कामगिरी पुढे भले भले इंजीनिअर फेल ; मुस्लीम सुताराने बसवले दीड टनाचे शिवलिंग

February 14, 2022

तुम्ही मुख्यमंत्री आहात हे एका दिवसासाठी विसरा आणि मग होऊन जाऊ द्या : नीलेश राणे

October 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group